Tarun Bharat

कर्नाटक: कोविड लसीकरण ड्राय रन सर्व जिल्ह्यात सुरू

बेंगळूर/प्रतिनिधी

कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन कर्नाटकातील सर्व ३० जिल्ह्यांमध्ये आज घेण्यात येत आहे. सकाळपासून या ड्राय रन मोहिमेला सुरुवात झाली. कर्नाटक सरकारने यासाठी जोरदार तयारी केली आहे. तसेच प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान देशात आज सर्वत्र ड्राय रन सुरु आहे.

राज्यात मॉक ड्रिल २६३ ठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाले. लसीकरणासाठी पहिली ड्राई रन २ जानेवारी रोजी राज्यातील निवडक पाच जिल्ह्यात झाली. यामध्ये बेंगळूर, गुलबर्गा, शिवमोगा, म्हैसूर आणि बेळगाव या पाच जिल्ह्यांमध्ये घेण्यात आली.
दुसऱ्या टप्प्यातील ड्राय रन आज होत असून, राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यातील ३० जिल्ह्यांमधील प्रत्येक सहा केंद्रे घेण्यात येतील. यामध्येच जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये रुग्णालये (शासकीय आणि खाजगी), शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, तालुका रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि खाजगी रुग्णालये यांचा समावेश असेल.

Related Stories

जुलै २०१५ पूर्वी दाखल झालेल्या पीजी वैद्यकीय विद्यार्थ्यांना सक्तीची सेवा लागू नाहीः कर्नाटक हायकोर्ट

Archana Banage

माजी बीबीएमपी नगरसेविकेच्या हत्येप्रकरणी आणखी ३ जणांना अटक

Archana Banage

चन्नम्मा विद्यापीठ इमारतीसाठी 110 कोटी

Amit Kulkarni

उपनोंदणी कार्यालये आजपासून पुन्हा सुरू

Amit Kulkarni

आरोग्यमंत्र्यांचे कोरोनामुक्त रुग्णांना ‘टीबी’ची तपासणी करण्याचे आवाहन

Archana Banage

कन्नड अभिनेत्री ऐश्वर्या कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage