Tarun Bharat

कर्नाटक-गोवा बससेवेला आजपासून प्रारंभ

बेळगाव : कर्नाटक-गोवा बससेवेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. कोरोना संसर्गामुळे दोन्ही राज्यातील बससेवा बराच काळ बंद होती. मात्र, आता शुक्रवार दि. 4 पासून कर्नाटक-गोवा बससेवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंडळाने दिली आहे.

परिवहन मंडळाने परवानगी दिल्याने अनलॉक चौथ्या टप्प्यात आंतरराज्य बससेवा सुरू होत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी कोरोनाच्या नियमांचे पालन करून प्रवास करावा लागणार आहे. सामाजिक अंतर राखून एका बसमध्ये मर्यादित प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. प्रवासादरम्यान मास्क लावणे बंधनकारक असून प्रवासासाठी बसेस सॅनिटायझर करून वापरल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंडळाने दिली आहे.

Related Stories

धुक्मयामुळे काजू-आंब्याच्या मोहोरावर परिणाम

Amit Kulkarni

एनपीएसवर चर्चेसाठी सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री

mithun mane

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगाव शुटोकॉन अकादमीचे घवघवीत यश

Amit Kulkarni

निराश्रीत केंद्रातील वृद्धाचा मृत्यू

Patil_p

निशिकांतच्या मोबाईलमधून मेसेज कोणी केला?

Patil_p

दांडेली वन्यजीवी विभाग कार्यालयासमोर निदर्शने

Omkar B
error: Content is protected !!