Tarun Bharat

कर्नाटक: चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मर्यादा ५० टक्के ठेवण्याची शिफारस

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकच्या कोविड-१९ तांत्रिक सल्लागार समितीने (टीएसी) राज्य सरकारला राज्यभरातील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा हॉल आणि चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची क्षमता ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. टीएसीने पुढील चार आठवड्यांसाठी सिनेमा हॉलमध्ये पर्यायी बसण्याचे महत्त्वही सांगितले आहे. हा कालावधी कोरोना महामारीच्या निरंतर दुसर्‍या लाटेत निर्णायक मानला जाणारा कालावधी आहे. तथापि, मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी अद्याप या प्रकरणी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीस, बृह बेंगळूर महानगर पालिकेने अशीच शिफारस ठेवली होती. बीबीएमपी कमिशनर एन मंजुनाथा प्रसाद यांनी सिनेमा हॉलमधून येणाऱ्या किती घटना घडल्या आहेत याची आम्हाला माहिती नाही, परंतु १०० टक्के क्षमता असलेले हे एक बंद ठिकाण आहे. त्यामुळे येथे एकत्रित आल्यास रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता जास्त आहे.

Related Stories

कारची धडक बसून महिला सफाई कर्मचारी ठार

Tousif Mujawar

अभिनेत्री रागिणी द्विवेदीला जामीन

Patil_p

टूलकिट प्रकरणी अधिक माहिती देण्यास गृहमंत्र्यांचा नकार

Amit Kulkarni

फुले उत्पादक संघटनेचे आज आंदोलन

Amit Kulkarni

बेंगळूर: खासगी रुग्णालयात २० टक्के बेड राखीव ठेवण्याचा बीबीएमपीचा निर्णय

Archana Banage

ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांना मदतीसाठी लवकरच अर्जांचे आवाहन

Amit Kulkarni
error: Content is protected !!