Tarun Bharat

कर्नाटक, तामिळनाडूची अंतिम फेरीत धडक

Advertisements

सईद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सईद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक व तामिळनाडू संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. शनिवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात कर्नाटकने रोहन कदमच्या 56 चेंडूतील 87 धावांच्या झंझावाती खेळीनंतर बंगालवर 4 धावांनी रोमांचक विजय प्राप्त केला तर दुसऱया उपांत्य लढतीत विद्यमान विजेत्या तामिळनाडूने हैदराबादचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. रोहनसाठी 27 डावातील हे 9 वे अर्धशतक आहे. त्याने 36 चेंडूत अर्धशतक साजरे केले आणि त्यानंतर आणखी आक्रमक पवित्र्यावर भर दिला. कर्नाटक-तामिळनाडू यांच्यात जेतेपदासाठी उद्या (सोमवार दि. 22) फायनल होणार आहे.

Related Stories

यशस्वी जैस्वालच्या शतकाने मुंबईचा डाव सावरला

Patil_p

सध्याच्या संघात केवळ दोनच रोल मॉडेल

Rohan_P

पोनप्पा-रेड्डी दुहेरीत उपविजेते

Patil_p

आयओसी अध्यक्ष बाक यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे आभार

Patil_p

‘त्या’ चेंडूचा वेग प्रतितास 175 नव्हताच!

Patil_p

पीव्ही सिंधूचे विश्वविजेतेपद राखण्यावर लक्ष

Patil_p
error: Content is protected !!