Tarun Bharat

कर्नाटक: तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका; मुलांसाठी वैद्यकीय सुविधा वाढविण्याचा सरकारचा निर्णय

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात येत्या तीन ते सहा महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट उद्भवण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे म्हंटले आहे. राज्य सरकार आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर, विशेषत: मुलांसाठी रूग्णालये आणि आयसीयू बेडवर उपलब्धतेवर काम करून कृती योजना तयार करीत आहे. तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की मुलांना पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तृतीय लाटेचा धोका जास्त असेल.

बालरोगविषयक अवस्थेत विकृती व मृत्युदर रोखण्यासाठी मार्ग सुचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या दोन तज्ज्ञ समित्यांच्या सदस्यांनी शुक्रवारी शहरात प्राथमिक चर्चा केली. बीबीएमपीचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता यांनी, मुलांची रूग्णालये स्थापन करण्यासाठी आणि विद्यमान सुविधांमध्ये आयसीयू बेडची संख्या वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार केले जात आहेत.

दुसर्‍या लाट हाताळण्यावर कडक टीका झाल्यानंतरही, सरकार मुलांना होणार धोका टाळण्यासाठी आणि योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तत्परतेने काम करत आहे. आतापर्यंत, मुले (०-९ वर्षे) तुलनेने संरक्षित केली गेली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी मार्चपासून जवळपास ७६ हजार मुलांना कोरोनाची लागण झाली. तसेच पाॅझिटिव्ह चाचणी घेतली असून दहा वर्षांखालील ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. १०-१९ वयोगटातील १.९ लाख प्रकरणे आणि ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी राज्यात आतापर्यंत एकूण २५.६ लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान तिसऱ्या लाटेचा मुलांवर काय परिणाम होईल हे स्पष्ट झाले नसले तरी त्यांना कोरोनाचा धोका संभवतो,” असे एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. तज्ञ पॅनल्सच्या सदस्यांनी सांगितले की एकाधिक उपसमिती गठित केल्या आहेत आणि बालरोगविषयक संभाव्य आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी याबद्दल अहवाल सादर करण्यास सांगितले. “त्यांना बालकांसाठी आयसीयू सुविधा उपलब्धता, प्रशिक्षित परिचारिका व गहन चिकित्सकांची संख्या आणि अतिरिक्त व सुधारीत पायाभूत सुविधांची आवश्यकता याबाबत सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” असे एका सदस्याने सांगितले. दुसर्‍या सदस्याने सांगितले की कर्नाटकात सुमारे दोन हजार बालरोग तज्ञ होते आणि ही चिंताजनक बाब होती.

Related Stories

बेंगळूर: शाळा, स्वयंसेवी संस्थांकडून ‘हेरिटेज सिटी’ला ऑक्सिजन पुरवठा

Archana Banage

सीईटीसाठी आजपासून अर्ज

Amit Kulkarni

कर्नाटकच्या कामगार मंत्र्यांना कोरोनाची लागण

Archana Banage

कर्नाटकात सक्रिय रुग्णसंख्येत घट कायम

Archana Banage

आरोग्यमंत्र्यांकडून राज्यात लॉकडाऊनचे संकेत

Archana Banage

कर्नाटकात गेल्या २४ तासात ५ हजार ६३१ रुग्ण कोरोनामुक्त

Archana Banage