Tarun Bharat

कर्नाटक: “त्या” महिलेने केला तिसरा व्हिडिओ प्रसिद्ध

बेंगळूर/प्रतिनिधी

विरोधी पक्ष कॉंग्रेसने गोककचे आमदार रमेश जारकिहोली यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याच्या काही दिवसानंतर, सेक्स सीडीशी संबंधित असलेल्या असलेल्या महिलेने शुक्रवारी आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. २९ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये तिने भाजपच्या माजी मंत्र्यांविरूद्ध तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

तिने या व्हिडिओमध्ये तिला पाठिंबा दिल्याबद्दल नागरिक, राजकीय पक्षांचे नेते आणि इतर संघटनांचे आभार मानले. ती म्हणाली, “त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मला पोलीस तक्रार नोंदविण्याचे धैर्य दिले आहे.”

दरम्यान, सलग दोन दिवस आणखी दोन व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याने विशेष तपास पथकावरील (एसआयटी) दबाव वाढला आहे, तपास यंत्रणा अद्याप या महिलेचा शोध घेऊ शकलेली नाही. माजी मंत्री महोदयांना बदनामी करण्यासाठी कथित प्रकरणात एका हनी ट्रॅप टोळीचा भाग असल्याचा त्यांना संशय आहे.

Related Stories

बेंगळूर: आर. आर. नगरमधून काँग्रेसच्या मेदवाराचा अर्ज सादर

Archana Banage

बेंगळूर हिंसाचार : एनआयएने १७ एसडीपीआय, पीएफआय सदस्यांना केली अटक

Archana Banage

कर्नाटक : झेडपी-तालुका पंचायत निवडणुकांच्या तारखांबाबत एसईसी आणि सरकार यांच्यात संघर्ष

Archana Banage

वैद्यकीय महाविद्यालये 1 डिसेंबरपासून सुरू

Omkar B

विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून बीएमटीसीने वसूल केला २ लाखाहून अधिक दंड

Archana Banage

भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास तत्काळ राजीनामा देईन : मंत्री श्रीरामुलु

Archana Banage