Tarun Bharat

कर्नाटक: दिवाळीत वायू प्रदूषणात ३० टक्के घट : केएसपीसीबी अहवाल

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (केएसपीसीबी) नोंदवले की गेल्या वर्षीच्या दिवसांच्या तुलनेत दिवाळीच्या तीन दिवसांत वायू प्रदूषण ३०.३४ टक्क्यांनी घट झाली आहे. केएसपीसीबीच्या निरीक्षणानुसार, १४ते १६ नोव्हेंबर या कालावधीत सरासरी वातावरणाची गुणवत्ता (एक्यूआय) बेंगळूरमधील सात देखरेख केंद्रांवर प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दर्शविते.

दरम्यान के.एस.आर.बेंगळूर रेल्वे स्टेशन (मॅजेस्टिक), पशुवैद्यकीय महाविद्यालय (हेब्बळ), कविका (म्हैसूर रोड) आणि एनआयएमएचएएनएस इथे वायू प्रदूषण समाधानकारक (५१-१००) राहिले, एसजी हळ्ळी, जयनगर ५ वा ब्लॉक आणि मध्य रेशीम बोर्ड येथे ५० च्या खाली खाली आले आणि हे प्रमाण चांगले आहे.

अधिकाऱ्यांचा माहितीनुसार प्रदूषण घटण्याचे कारण म्हणजे सध्या असलेला कोरोना साथीचा प्रादुर्भाव आणि प्रदूषणाचा आरोग्यावर होणार परिणाम लक्षात गेट यावर्षी फटाके उडविणे कमी केल्याने प्रदूषणात घट झाली.

Related Stories

म. ए. समितीतर्फे जांबोटीत जनजागृती फेरी

mithun mane

कोरोनामुळे आणखी दोन महिलांचा मृत्यू

Tousif Mujawar

कोविड-१९ व्यवस्थापनासंदर्भात केंद्र सरकारकडून केरळ, महाराष्ट्रात उच्चस्तरीय पथके

Archana Banage

अमेझॉनच्या घनदाट जंगलात उकळणाऱया पाण्याची नदी

Patil_p

म्हासुर्ली परिसरात वन तस्करांकडून चोरटी वृक्षतोड ; वन – सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष

Archana Banage

चार दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले

Archana Banage