Tarun Bharat

कर्नाटक: दोन लाखाहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात

बेंगळूर/प्रतिनिधी


कर्नाटकमधील कोरोनाचा वाढता आलेख कायम असून मंगळवारी राज्यात ८ हजाराहून अधिक रुग्णांची भर पडली. तर ६ हजाराहून अधिक जणांना कोरोनातून बरे झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर एक महत्वाची बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत दोन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांनी कोरोना विरुद्ध लढाई जिंकली आहे.

मंगळवारी ६, ८१४ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत एकूण २, ०४,४३९ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ८,१६१ नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण २,९१,८२६ रूग्णांपैकी ४,९७७ रुग्णांना वाचवता आले नाही. यापैकी १९ जणांचा मृत्यू कोरोना व्यतिरिक्त आजाराने झाला आहे. राज्यात एकूण ८२,४१० रुग्ण उपचार घेत आहेत तर ७५१ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत.

Related Stories

पशु हत्या प्रतिबंध आणि संरक्षण विधेयक शेतकरी विरोधी

Archana Banage

चक्रीवादळामुळे भरकटलेल्या ‘त्या’ बोटीतील 9 जणांचे रक्षण

Amit Kulkarni

दोन आठवडयात कोल्हापूर- बेंगळूर विमानसेवा सुरू होणार- खासदार महाडिक

Abhijeet Khandekar

कर्नाटक: शिक्षणमंत्र्यांनी ‘विद्यागम’ योजनेचा घेतला आढावा

Archana Banage

मान्सूनचा गोवा आणि दक्षिण कोकणात प्रवेश

Rohit Salunke

कन्नड शब्दकोषतज्ञ प्रा. वेंकटसुब्बय्या यांचे निधन

Amit Kulkarni