Tarun Bharat

कर्नाटक : नेतृत्व बदलावरून उपमुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांबाबत महत्वाचं विधान

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात भाजपमध्ये नेतृत्वात बदल होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पक्षश्रेष्टी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या ठिकाणी नेतृत्वाच्या शोधात असल्याचे म्हंटले जात आहे. पण राज्यात नेतृत्व बदलावरून सुरु असलेल्या चर्चांना फेटाळून लावत उपमुख्यमंत्री डॉ.सी.एन. अश्वनाथनारायण यांनी येडियुरप्पा हेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनच कायम राहतील असे म्हंटले आहे. राज्यात सुरु असेल्या चर्चा या अफवा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. पक्षात असे कोणतेही बदल होणार नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

राज्याच्या विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी, बरेच मंत्री आपल्या विभागांशी संबंधित मुद्द्यांवरून दिल्लीत जातात आणि केंद्रीय मंत्र्यांसमवेत भेटतात, त्यामुळे राज्यात नेतृत्व बदलांविषयी अनुमान काढणे योग्य ठरणार नाही.

उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गुन्हे शाखा (सीसीबी) मादक द्रव्याच्या तस्करीची चौकशी करत आहे. या व्यवसायाची खोलवर मुळे रोवली गेली आहेत. त्यामुळे कारवाईत जे दोषी आढळतील सरकार त्या दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हंटले. या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. तसेच चौकशी करणाऱ्यांना चौकशी करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

आमदार यत्नाळ यांना पक्षाकडून नोटीस

Archana Banage

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला लगाम घालण्यासाठी सरकार सज्ज

Archana Banage

प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन जनरेटर स्थापण्याचा विचार

Amit Kulkarni

पूर नियंत्रणासंबंधी जिल्हा प्रशासनांना सूचना

Amit Kulkarni

बेंगळूर: शहरात ड्रग्स तस्करी होणार असल्याने पोलिसांकडून वाहनांची तपासणी

Archana Banage

सायबर गुन्हय़ांना समर्थपणे तेंड देणार!

Amit Kulkarni