Tarun Bharat

कर्नाटक : पीएम मोदींचा बोम्माईंना फोन, पूर परिस्थितीवर चर्चा

बेंगळूर : प्रतिनिधी

मंगळवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याशी फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तसेच राजधानी बेंगळुरूमधील पूरस्थितीबद्दल विचारणा केली. गेल्या एक महिन्यापासून कर्नाटकातील अनेक भागांना विलक्षण मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे.
“माननीय पंतप्रधान नरेंद्र यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर माझ्याशी संवाद साधला. माननीय पंतप्रधानांनी जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला असून पिकाच्या नुकसानाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. पंतप्रधानांनी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले,” बोम्माई यांनी ट्विट केले.

भारताची तंत्रज्ञान राजधानी मानल्या जाणार्‍या बेंगळूरमधील पूरग्रस्त निवासी भागांची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असल्याच्या एका दिवसानंतर पंतप्रधान मोदी आणि बोम्माई यांच्यातील टेलिफोन कॉल झाला.

Related Stories

कॉंग्रेसने राज्य सरकारवर साधला निशाणा; परिस्थिती हाताळण्यात अपयश

Archana Banage

अधिकाऱयाने ओकली गरळ, कॉन्स्टेबलनी केले सरळ!

Amit Kulkarni

चिकन-अंडय़ांच्या मागणीत वाढ

Amit Kulkarni

यंदा प्रथमच दसरा सुटीनंतर सहामाही परीक्षा

Amit Kulkarni

बेळगावमधील शिवभक्त तरुणांवरील राजद्रोहाचे गुन्हे मागे घ्या

Abhijeet Khandekar

माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी कोरोनामुक्त

Archana Banage