Tarun Bharat

कर्नाटक : पोलिसांवर केलेल्या वक्तव्याबद्दल गृहमंत्र्यांविरोधात तक्रार

Advertisements

बेंगळूर / प्रतिनिधी

कर्नाटक राज्य रैथा संघ आणि हसिरू सेनेहावे यांनी कर्नाटक राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी पोलिसांविरुद्ध केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल चिक्कमगलूर जिल्ह्यातील कोप्पा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

व्हिडिओमध्ये गृहमंत्र्यांनी असे म्हटले आहे की, गुरे चोरी आणि तस्करी करणाऱ्या लोकांकडून पोलिस लाच घेत आहेत. “तुम्ही (पोलीस) गुरे तस्करांकडून लाच घेऊन झोपता आणि ते बिनदिक्कत काम करत आहेत. पोलिस पैसै घेतल्यानंतर कुत्र्यासारखे झोपत आहेत…
गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र सांगितले की कर्नाटक पोलिसांनी देशात चांगले नाव कमावले आहे, पण काही पोलिस गुरे चोरी करणाऱ्या लोकांवर कारवाई करत नाहीत. गोहत्येवर संपूर्ण बंदी आणण्यावर सरकारचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर गृहमंत्र्यांनी शनिवारी स्पष्ट केले की ते त्यांच्या मतदारसंघात घडलेल्या एका घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलले होते जेथे बेकायदेशीरपणे गायींची वाहतूक करणार्‍या ट्रकच्या मागे जात असताना बजरंग दलाच्या दोन गौरक्षकावर हल्ला झाला होता.

राज्य रैथा संघ आणि हसिरु सेने यांनी तक्रारीत म्हटले आहे की, गृहराज्यमंत्र्यांचे पोलिसांविरुद्धचे वक्तव्य अवमानकारक असून त्यामुळे पोलिस खात्याची मान खाली येईल अशी टिप्पणी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.

Related Stories

हलगा रस्त्यावरील तात्पुरत्या भाजीमार्केटमध्ये गर्दी

Patil_p

खानापुरातील महाविद्यालयांतील विद्यार्थी-प्राध्यापकांची स्वॅब तपासणी

Omkar B

अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची घाईगडबड

Patil_p

बेळगाव-बेंगळूर आराम बसला आग

Patil_p

निवडणुकीच्या धांदलीत घरोघरी पोहोचतंय मटण!

Patil_p

दहावी परीक्षेचा निकाल मे च्या दुसऱया आठवडय़ात

Amit Kulkarni
error: Content is protected !!