Tarun Bharat

कर्नाटक पोस्ट विभागात 2 हजार 443 जागांसाठी भरती

Advertisements

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी : 20 जानेवारीपर्यंत करता येणार अर्ज

प्रतिनिधी / बेळगाव

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कर्नाटक पोस्ट विभाग 2021 या नववर्षात तब्बल 2443 जागांची भरती करून घेणार आहे. पोस्टमन, मेल गार्ड, एमटीएस, जीडीएस, पोस्ट असिस्टंट यासह इतर पदांचा यामध्ये सहभाग असणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱया गेल्या आहेत. तसेच शिक्षण घेतलेले अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. अशा युवकांना पोस्ट विभागाने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. येत्या वर्षात पोस्ट विभाग विविध पदांसाठी जागा भरून घेणार आहे. बऱयाच दिवसांनी इतकी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही पूर्णपणे ऑनलाईन प्रकिया आहे.

त्यामुळे इच्छुकांनी 20 जानेवारीपर्यंत पोस्ट खात्याच्या बेवसाईटवर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. दहावी उत्तीर्ण तसेच काही पदांसाठी संगणकाचे प्राथमिक शिक्षण असणे गरजेचे आहे. 18 ते 40 वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. जनरल व ओबीसी अर्जदारांसाठी 100 रुपये अर्ज फी तर अनुसूचित जाती-जमाती व महिलांना कोणत्याही प्रकारची फी नाही.

Related Stories

प्रवासी रेल्वेमधून मालवाहतुकीचा उपक्रम

Patil_p

सावज हेरणार अन् पैशांचा पाऊस पाडणार!

Amit Kulkarni

आनंद अकादमी अ संघाची विजयी सलामी

Amit Kulkarni

कर्नाटकातील दहा जिल्ह्यांमध्ये कायम स्वरूपी आपत्ती केंद्रे स्थापन केली जाणार

Archana Banage

बासरी वादनाने श्रोत्यांची संध्याकाळ स्मरणीय

Amit Kulkarni

युनायटेड फोर्ट व्हॉलीबॉल चषक अशोक पाटील संघाकडे

Amit Kulkarni
error: Content is protected !!