Tarun Bharat

कर्नाटक: बांधकाम व्यावसायिक चिंतेत, फक्त १ लाख कामगारांनाच मिळाली लस

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हा एकच पर्याय असल्याचे आरोग्य विभागाने म्हंटले आहे. देशात १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परंतु कोरोना लसीचा पुरवठा वेळेत होत नसल्याने लसीकरण संथ गतीने सुरु आहे. दरम्यान, कर्नाटकात कोरोना लॉकडाऊनमुळे आलेला अडथळा आणि मंद गतीने होणारे लसीकरण प्रक्रिया यामुळे रिअल इस्टेट विकसकांच्या चिंतेत भर घालत आहे, त्यांना अशी भीती वाटते की कर्मचार्‍यांच्या प्रदीर्घ कमतरतेमुळे प्रकल्पाच्या कामाला वेळ लागेल आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागेल. आरोग्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव, बरेच बांधकाम व्यावसायिक केवळ अशा कामगारांना साइटवर बोलवत आहेत ज्यांनी लसीचा किमान एक डोस घेतला आहे. पण अशा कामगारांची संख्या देखील सध्या मोठी नाही. राज्यातील नोंदणीकृत २५ लाख कामगारांपैक्की १ लाख कामगारांना लस मिळाली आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कर्नाटकमध्ये २५ लाख नोंदणीकृत बांधकाम कामगार असून बेंगळूरमध्ये सुमारे २५ टक्के कामगार काम करतात. बेंगळूरच्या कन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीआरडीएआय) चे उपाध्यक्ष एरॉल फर्नांडिस यांनी सांगितले की २५ लाख कामगारांपैकी जवळपास १ लाख जणांनाच लस देण्यात आली आहे. याशिवाय हजारो नोंदणी नसलेले कामगार आहेत, ” असे ते म्हणाले.

Related Stories

कर्नाटक: नीट परीक्षा : विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका : उपमुख्यमंत्री

Abhijeet Shinde

‘टूलकिट’प्रकरणी बेंगळूरमधून पहिली अटक

Patil_p

कर्नाटक : कोरोनाची दुसरी लाट बनली जीवघेणी

Abhijeet Shinde

गदारोळात विधानसभेची अर्थसंकल्पाला मंजुरी

Patil_p

कर्नाटकात गुरुवारी ११४३ बाधितांची नोंद

Abhijeet Shinde

बस कर्मचारी संप : रस्त्यावर शांतता आणि प्रवाशांचे हाल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!