Tarun Bharat

कर्नाटक बिटकॉइन घोटाळा: भाजपने नेतृत्व बदलाची शक्यता फेटाळली

बेंगळूर / प्रतिनिधी

वादग्रस्त बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याच्या चर्चांचे भाजपने सोमवारी खंडन केले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कर्नाटक प्रभारी अरुण सिंग यांनी ह्या चर्चा अफवा असल्याचे सांगून फेटाळून लावले.

अरुण सिंग यांनी बिटकॉइन प्रकरणाची “प्रभावी” हाताळणी केल्याबद्दल बोम्माईचे कौतुक केले आहे ते म्हणाले, “काँग्रेसच्या आरोपात काही तथ्य नाही”. बिटकॉइन घोटाळा ज्या पद्धतीने राजकारणी आणि नोकरशहा यांनी हाताळला आहे, त्यामुळे सर्व राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे वळले.राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच सिंग यांचा नकार आला आहे.

जरी मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की मुख्यमंत्री राष्ट्रीय राजधानीत एका खाजगी टीव्ही चॅनेलद्वारे आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत तरी Bitcoin प्रकरणामुळे बोम्माईंच्या 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नवी दिल्लीच्या वारीकडे देखील सर्वांचे लक्ष लागुन आहे.
जुलैच्या अखेरीस बोम्माई यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. दरम्यान, माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अरविंद लिंबवली यांच्या जागी कटील यांची वर्णी लागणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. हनगलमधील भाजपची कामगिरी हे राज्य नेतृत्वाची पुनर्रचना करण्यासाठी हायकमांडचे कारण असू शकते, बिटकॉइन प्रकरण देखील या निर्णयात भूमिका बजावू शकते. हे प्रकरण उशिरापर्यंत गाजत आहे आणि त्यात प्रभावशाली राजकारणी सामील असल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर दडपशाहीचा आरोप केला आहे.

Related Stories

अखेर अनगोळ चौथ्या रेल्वे गेटचे काम पूर्ण

Amit Kulkarni

निगवेतील नृसिंह सरस्वती मंदिरास ब वर्ग तीर्थ क्षेत्र दर्जा

Abhijeet Khandekar

मरणहोळ येथील शेतकऱयांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Patil_p

महाराष्ट्रात मागील 24 तासात 5,011 नवे कोरोना रुग्ण; 100 मृत्यू

Tousif Mujawar

कर्नाटक : साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महेश जोशी आघाडीवर

Abhijeet Khandekar

वाटल्यास, तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करू; प्रविण दरेकरांनी साधला राऊतांवर निशाणा

Archana Banage