Tarun Bharat

कर्नाटक बिटकॉइन घोटाळ्याचा सुत्रधार हॅकर श्रीकी ‘बेपत्ता’

जामीन आदेश मागे घेण्यासाठी पोलिसांची हलचाल

Advertisements

बेंगळूर / प्रतिनिधी

गेले काही दिलस बेपत्ता असलेला कर्नाटक बिटकॉइन घोटाळ्याचा सुत्रधार कुख्यात हॅकर श्रीकृष्ण उर्फ ​​श्रीकीचा जामीन आदेश मागे घेण्यासाठी बेंगळूर पोलिस न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. तसेच त्याला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी परवानगी घेण्याचाही पोलिसांचा विचार आहे.बेंगळूर शहर पोलिसांच्या सूत्रांनी मिडीयाला सांगितले की, सध्या जामिनावर बाहेर असलेल्या श्रीकीने जामिनाच्या अटींचे उल्लंघन करून तो “बेपत्ता” झाला आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, जीवनभीमा नगर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यात जामीन अटींनुसार, श्रीकीने दर शनिवारी तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहून रजिस्टरवर सही करायची होती. “तीन आठवड्यांपूर्वी तुरुंगातून सुटल्यानंतर तो पोलिसांसमोर आला नाही. तसेच तो चौकशीतही मदत करत नाही,”

“न्यायालयात प्रकरणाची सुनावणी सुरू असल्याने आम्हाला तपासाचा तपशील न्यायालयात सादर करावा लागेल. मात्र तीन आठवड्यांपर्यंत तो कुठे आहे, हे आम्हाला माहीत नाही. जर त्याला कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीतून सामोरे जावे लागले असेल तर ते तपास अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणले पाहिजे. मात्र त्याच्या ठावठिकाणाबाबत कोणताही संवाद झालेला नाही. म्हणून, आम्ही तपास पथकाला त्याच्या जामीन आदेश मागे घेण्यासाठी न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले आहेत” अधिकारी पुढे म्हणाले.

त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा आरोप विरोधी पक्षाने त्यांनी केल्यानंतर शहर पोलिसांनी खरे तर त्याला हॅकर सुरक्षा कवच दिले होते. त्याच्या ठावठिकाणाबाबत सुरक्षा पोलिस कर्मचारीही अंधारात आहेत. काही दिवसापुर्वी श्रीकी यांच्यावर अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली हॉटेल कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related Stories

यंदा परिवहनच्या व्यावसायिक हंगामावर पाणी

Patil_p

खरेदीला उधाण; सर्वत्र चक्काजाम

Amit Kulkarni

मनपाकडून स्वच्छता कामगारांना रेनकोट

Amit Kulkarni

मिरज-मंगळूर एक्स्प्रेसची गरज

Amit Kulkarni

बेंगळूर: बीबीएमपीने १९ खासगी रुग्णालयांचे परवाने केले रद्द

Abhijeet Shinde

जिल्हय़ात 420 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Amit Kulkarni
error: Content is protected !!