Tarun Bharat

कर्नाटक: बिबट्याला वाचविण्यासाठी वन अधिकार उतरले १०० फूट खोल विहिरीत

म्हैसूर/प्रतिनिधी

पाच दिवसापूर्वी शंभर फूट खोल कोरड्या विहरीत पडलेल्या एका बिबट्याला वाचविण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. कर्नाटकच्या वनविभागाच्या पथकाने बिबट्याला वाचवल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले.
पाच दिवसापूर्वी कोरड्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वनविभागाला मिळताच एका अधिकाऱ्याने बिबट्याला वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून खाली १०० खोल कोरड्या विहिरीत जाऊन बिबट्या विहिरीत आहे का नाही हे पहिले. यावेळी त्यांच्या निदर्शनास बिबट्या आला. यांनतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढत जंगलात सुरक्षितस्थळी सोडून दिले.

कर्नाटकातील वन अधिकाऱ्याने 100 फूट खोल कोरड्या विहिरीत आत आत उतरून ग्रामस्थांच्या मनात असणारी बिबट्या सापडल्याची भीती दूर करून बिबट्याला जीवदान दिल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर या कामगिरीचे कौतुक केले आहे.

शनिवारी म्हैसूरच्या एचडी कोटे येथे ग्रामस्थांकडून तक्रारी आल्यानंतर आरएफओ कारवाईस सामोरे गेले. घटनास्थळावरील वन अधिकारी कॅमेरा आणि ध्वनी उपकरणांच्या मदतीने प्राण्यांचा शोध घेऊ शकले नाहीत. यांनतर त्यांनी स्वतः या ठिकाणी जाऊन बिबट्याचा शोध घेण्याचे ठरविले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

Related Stories

अनैतिक संबंधातून युवकाचा निर्घृण खून

Tousif Mujawar

डॉ.कोडकिणी हॉस्पिटलतर्फे 15 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Amit Kulkarni

किल्ल्यांमुळे तालुक्यात शिवसृष्टी अवतरल्याचा भास

Amit Kulkarni

पांगुळ गल्लीत वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Amit Kulkarni

पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांविषयी अधिक संवेदनशील असलं पाहिजे : सिद्धरामय्या

Archana Banage

यशवंतपूर- पंढरपूर, म्हैसूर-निजामुद्दीन साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार

Amit Kulkarni