Tarun Bharat

कर्नाटक: भाजपने पंतप्रधानांवर दबाव आणावा

बेंगळूर/प्रतिनिधी

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील सत्तारूढ भाजपा सरकारला केंद्राची राज्य ध्वजासाठी मान्यता मिळावी, अशी विनंती केली आहे. दरम्यान भाजप नेत्यांनी राज्य ध्वजास मान्यता देण्यासाठी थेट पंतप्रधानांवर दबाव आणावा असे त्यांनी म्हंटले आहे.

सिद्धरामय्या यांनी मी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात, कन्नड ध्वज केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविला होता. ध्वज इतिहास, संस्कृती आणि कायदेशीर मुद्द्यांवर आधारित तज्ज्ञ समितीने डिझाइन केला होता. राज्य ध्वज भाजपाला मंजूर नाही आणि यामुळे भाजपाचा पर्दाफाश होतो. तसेच कन्नडिगांबद्दल पूर्वग्रह आहे, असे ते म्हणाले.

सिद्धरामय्या यांनी असा दावा केला की राज्यघटनेत असे कोणतेही कलम नाही जे राज्यांना स्वतःचा ध्वज असण्यास मनाई करते. त्यामुळे भाजप नेत्यांनी केंद्रीय भाजपा नेत्यांचे मत विचारात न घेता, थेट पंतप्रधानांना कर्नाटकच्या ध्वजाला अधिकृत दर्जा देण्यासाठी दबाव आणावा, असे म्हंटले आहे.

राज्योत्सवाला अनेक जिल्हा प्रशासकीय संस्थांनी कन्नड राज्य ध्वज फडकविला नाही, यावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला होता. दरम्यान मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बेंगळूर येथे झालेल्या कार्यक्रमात राज्य ध्वज पडकविला होता.

Related Stories

आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची अंतिम मुदत संपली

Archana Banage

जगप्रसिद्ध जोग फॉल्स पर्यटकांसाठी मुक्त

Amit Kulkarni

कर्नाटकचे इंडिया इनोव्हेशन इंडेक्स रँकिंगमध्ये अव्वल स्थान कायम

Archana Banage

बेंगळूर: जनता खोट्या आश्वासनांना फसणार नाही

Archana Banage

कर्नाटक विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २१ सप्टेंबरपासून

Archana Banage

कर्नाटक: शुक्रवारी दिल्लीला जाणार- मुख्यमंत्री बोम्माई

Archana Banage