Tarun Bharat

कर्नाटक: भ्रष्टाचार प्रकरणी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि त्यांच्या मुलाला हायकोर्टाची नोटीस

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना भ्रष्टाचार प्रकरणी नोटीस पाठवली आहे. दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, त्यांचे पुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र तसेच माजी मंत्री एस टी सोमशेखर आणि आयएएस अधिकारी यांना गृहनिर्माण प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी नोटीस पाठवली आहे.

सामाजिक कार्यकर्ते टी. जे. अब्राहम यांनी या प्रकरणात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती एस सुनील दत्त यादव यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने या सर्वांच्या विरोधात नोटिसा बजावण्याचे निर्देश दिलेत. या वर्षी ८ जुलै रोजी विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशाला याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. विशेष न्यायालयाने तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि तत्कालीन मंत्री सोमशेखर यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी मागणारी याचिका फेटाळली होती. हे प्रकरण बेंगळूर विकास प्राधिकरणाच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी कथितरित्या लाच घेण्याशी संबंधित आहे. जेव्हा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आणि काही गंभीर आरोप केले तेव्हा या विषयावर
बंगळुरूमध्ये ६६२ कोटी रुपये खर्च करून अपार्टमेंट बांधण्याशी संबंधित हे प्रकरण आहे. यापूर्वी, अनेक काँग्रेस नेत्यांनी येडियुरप्पा, त्यांचा मुलगा, जावई आणि जवळचे नातेवाईकांनी या प्रकल्पात भ्रष्टाचार तसंच लाच घेतल्याचे आरोप केले होते. कोलकात्यातील एका बनावट कंपनीमार्फत लाच मागितली गेली आणि पैसे दिले गेले असा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही वेळोवेळी करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी बीएस येडियुरप्पा यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली. बसवराज बोम्मई यांनी २८ जुलै रोजी कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २६ जुलै २०१९ रोजी काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडल्यानंतर बीएस येडियुरप्पा चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण आता कर्नाटकात मुख्यमंत्री बदलल्यानंतर बीएस येडियुरप्पा यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

Related Stories

बेंगळूर : बीबीएमपी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर निर्बंध आणणार

Archana Banage

कर्नाटक: अमित शाह यांच्या दौर्‍यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता

Archana Banage

येडियुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Archana Banage

विधानसभेत 14 विधेयके संमत

Patil_p

कर्नाटकात आतापर्यंत २८ लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Archana Banage

बेंगळूर: संपतराज फरार होणे पोलिसांसाठी डोकेदुखी

Archana Banage