Tarun Bharat

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार : २९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

बेंगळूर/प्रतिनिधी

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ विस्ताराला भाजप हायकमांडने परवानगी दिल्यानंतर आज दुपारी २९ आमदारांनी नवीन मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, ज्यांचा मंत्रिमंडळ समावेश आहे त्या आमदार आणि एमएलसींना मुख्यमंत्री बोम्मई यांनी फोन करून बेंगळूरला बोलावले होते. शपथविधी दरम्यान, सर्व कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आणि सामाजिक अंतर राखत हा शपथविधी सोहळा राजभवनाच्या ग्लास हाऊसमध्ये पार पडला

दरम्यान, बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या नवनियुक्त मंत्रिमंडळाने आज दुपारी २.१५ वाजता शपथविधी सोहळा सुरु झाला. शपथविधी सोहळा बेंगळूरमधील राजभवनाच्या ग्लास हाऊसमध्ये पार पडला. यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नवीन मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

दरम्यान, बुधवारी बोम्माई यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात शपथ घेणारे आणि समाविष्ट असणारे मंत्री माजी उपमुख्यमंत्री गोविंद एम. कारजोळ आणि माजी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा पहिले दोन मंत्री होते. कारजोळ बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते, तर ईश्वरप्पा हे शिवमोगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Related Stories

पाकिस्तानकडे लस खरेदीसाठीही नाहीत पैसे

datta jadhav

डीसीसी बँकांमधील कर्जे माफ करण्याचा विचार

Amit Kulkarni

उसने पैसे घेतलेल्या मानसिक तणावातून महिलेचा हृदयविकाराने मृत्यू; पोलिसात गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

फडणवीस 10 तासानंतर मुंबईत परतले, हालचालींना वेग

datta jadhav

‘भारत जोडो’चा महाराष्ट्रातील आज शेवटचा दिवस, उद्या मध्यप्रदेशात करणार प्रवेश

Archana Banage

कर्नाटक राजद्रोह प्रकरण: “कारवाई केलेल्या विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घ्या”

Archana Banage
error: Content is protected !!