Tarun Bharat

कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, पंजाब उपांत्य फेरीत

Advertisements

वृत्तसंस्था/ पुणे

पिंपरी चिंचवडच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 2021 सालातील पुरूषांच्या 11 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि पंजाब यांनी उपांत्य फेरी प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना सोमवारी खेळविला जाणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात कर्नाटकाने बंगालवर 3-2 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळवीत उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात नवव्या मिनिटाला बंगालचे खाते अलसेम लाक्राने उघडले पण त्यानंतर सामन्यातील दुसऱया 15 मिनिटांच्या कालावधीत कर्णधार मोहम्मद रहीलने तसेच हरीष मुटागेर यांनी गोल नोंदवून आपल्या संघाला आघाडीवर नेले. सामन्याच्या उत्तरार्धात कर्नाटकातर्फे निर्णायक तिसरा गोल तर पंजाबने दुसरा गोल केला.

उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य एका सामन्यात पंजाबने चंदीगडचा 2-1 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. पंजाबतर्फे कर्णधार रूपिंदरपाल सिंगने 46 व्या आणि 53 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले. चंदीगडतर्फे एकमेव गोल 50 व्या मिनिटाला अर्षदीप सिंगने केला.

उत्तरप्रदेश संघाने हरियाणाचा 2-1 असा पराभव करत शेवटच्या चार संघांत स्थान मिळविले. उत्तरप्रदेश संघातर्फे मोहम्मद अमीर खानने 13 व्या तसेच मोहम्मद   सादीकने 25 व्या मिनिटाला गोल केले. हरियाणातर्फे एकमेव गोल कर्णधार मनदीपने 13 व्या मिनिटाला नोंदविला. उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य एका सामन्यात महाराष्ट्राने पेनल्टी शूटआऊटमध्ये तामीळनाडूचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे गोल बरोबरीत होते. महाराष्ट्रातर्फे प्रताप शिंदेने तसेच कर्णधार तालेब शहा यांनी प्रत्येकी एक गोल तर तामीळनाडूतर्फे एस. कार्तीने दोन गोल केले. आता या स्पर्धेत  उत्तरप्रदेश आणि कर्नाटक तसेच महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यात उपांत्य फेरीचे सामने खेळविले जातील.

Related Stories

रात्रीची एफ-वन मोटार शर्यत लास व्हेगासमध्ये

Amit Kulkarni

दक्षिण आफ्रिका टी-20 वर्ल्ड कप संघात तीन स्पिनर्स

Amit Kulkarni

विजयासह ‘प्लेऑफ’ स्थान गाठण्यास मुंबई इंडियन्स सज्ज

Patil_p

इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीत पावसाचा व्यत्यय

Patil_p

यू-19 विश्वचषकात भारत-लंका लढत आज

Patil_p

झिम्बाब्वे संघ जाहीर, एर्विनकडे नेतृत्व

Patil_p
error: Content is protected !!