Tarun Bharat

कर्नाटक : माझी बदनामी करण्याचा ‘राजकीय कट’ : जारकिहोळी

बेंगळूर/प्रतिनिधी

नोकरीच्या आमिषाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच माजी मंत्री जारकिहोळी यांची एक सेक्स सीडी देखील व्हायरल झाली आहे. यांनतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान माजी मंत्री जारकिहोळी यांनी पत्रकार परिषद घेत माझी राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी हा कट असल्याचे आरोप केले.

आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत जारकिहोळी यांनी व्हिडिओ आणि सीडी बनावट असून ते माझ्याविरूद्ध रचलेला कट आहे. मी निर्दोष आहे, यावेळी रमेश जारकीहोळी यांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांनी मला या “सीडी बद्दल मला चार महिन्यांपूर्वी माहित होते आणि काहीच वेळापूर्वी माझ्या भावाशी चर्चा झाली की मी काहीही चूक केली नाही.

जारकिहोळी यांनी “व्हिडिओमधील व्यक्ती मी नाही. मला उच्च कमांडकडून सांगण्यात आले की असे आरोप माझ्यावर लादले जाऊ शकतात. यासाठी कायदेशीर मदत घेण्याचा सल्ला दिला होता. तरीही मी असे म्हटले आहे की मी हे आरोप खोडून काढण्यासाठी लढणार.”

हा वाद निर्माण करण्यासाठी २० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. बेंगळूरमधील यशवंतपूर आणि हुळीमावु या दोन ठिकाणी हे कट रचल्याचा आरोप जारकिहोळी यांनी केला. “माझ्याकडे माहिती आहे की सीडीमध्ये सहभागी असलेल्या मुलीला परदेशात पाच कोटी आणि दोन फ्लॅट दिले आहेत. माझ्याविरूद्ध कट रचण्याचा सौदा यशवंतपूरमधील ओरियन मॉलजवळील फ्लॅटमध्ये करण्यात आला. माझी प्रतिमा आणि राजकीय कारकीर्द बिघडू नये यासाठी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आणि माजी मुख्यमंत्री व जद (एस) नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

Related Stories

कर्नाटकात मुसळधार पाऊसाची शक्यता, अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट

Archana Banage

लॉकडाउननंतर प्रथमच सिनेमा हाऊसफुल

Archana Banage

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ‘कोरोना नाकाबंदी’

Archana Banage

म्हैसूरः बोटॅनिकल गार्डनचे डिसेंबरमध्ये उद्घाटन होण्याची शक्यता

Archana Banage

बेंगळूर: “कोरोना लसीकरणासाठी तंबाखूजन्य पदार्थांवरील कर वाढवा”

Archana Banage

तामिळनाडूतील प्रवाशांसाठी कोरोना नकारात्मक अहवाल बंधनकारक

Archana Banage