Tarun Bharat

कर्नाटक : मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त पाहणी दौऱ्याला सुरुवात

Advertisements

बेळगाव, बागलकोट, रायचूर जिल्ह्यांचा दौरा करणार

बेंगळूर/प्रतिनिधी

मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आणि महसूलमंत्री आर. अशोक मंगळवारी राज्यातील पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण करणार आहेत. मुख्यमंत्री बेळगावमध्ये दाखल झाले असून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये ते बेळगाव, बागलकोट, रायचूर जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

अधिकृत माहितीनुसार येडियुरप्पा मंगळवारी सकाळी एचएएल विमानतळावरून मंत्री अशोक यांच्याबरोबर खास विमानाने प्रथम बेळगाव विमानतळावर येतील. तेथून ते भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून पूर परिस्थितीचा अंदाज घेतील. या वेळी ते बेघर लोक आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतील.

हवाई सर्वेक्षणानंतर त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून झालेल्या नुकसानाची माहिती मिळेल आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतील. तेथून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बागलकोट आणि रायचूर जिल्ह्यातील आढावा घेईल. उपमुख्यमंत्री गोविंद , बागलकोट, रायचूर आणि गडाग जिल्ह्याचे प्रभारी मंत्रीही त्यांच्यासमवेत असतील. आढावा घेतल्यानंतर दोन्ही जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतील.

Related Stories

विजापूर शहरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला

Archana Banage

कर्नाटकात 21 एप्रिल रोजी राज्य सरकारी कर्मचारी दिन

Amit Kulkarni

कोरोनाचे नियम पाळा, लॉकडाऊन टाळा!

Amit Kulkarni

कर्नाटक: ‘हे’ आहेत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत, प्रल्हाद जोशी सर्वाधिक चर्चेत

Archana Banage

सीबीआयकडून जिल्हा परिषद सदस्यांच्या हत्येप्रकरणी काँग्रेसच्या माजी मंत्र्याची चौकशी

Archana Banage

कर्नाटक : कोरोना लसीकरणाची तयारी सुरू

Archana Banage
error: Content is protected !!