Tarun Bharat

कर्नाटक: मुख्यमंत्री ग्रामपंचायतींशी साधणार संवाद

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकातील ग्रामीण भागात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निवडक ग्रामपंचायतींशी संवाद साधणार आहे.

“बुधवारी मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उच्चपदस्थ असलेल्या निवडक ग्रामपंचायतींशी संवाद साधतील,” असे गृहमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले. पत्रकारांशी बोलतानागृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी, “बेंगळूरसारख्या शहरांमध्ये कोरोना नियंत्रणात येत असल्याचे संकेत दिल्याने आता सरकारचे लक्ष ग्रामीण भागाकडे लागले आहे आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासह जिल्हा प्रशासनांना अधिक जबाबदारी देण्यात आली आहे.”

गृहमंत्री बोम्माई म्हणाले की ग्रामीण भागातील सूक्ष्म कंटेनमेंट झोनबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, पीडीओ (पंचायती विकास अधिकारी), आरोग्य अधिकारी आणि संबंधित हद्दीतील पोलीस अधिकारी यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

Related Stories

कर्नाटकः नव्या राज्यपालांचा शपथविधी ११ जुलै रोजी

Archana Banage

कोरोना: कर्नाटक ५ व्या क्रमांकावर, सक्रिय प्रकरणांमध्ये दुसऱ्या स्थानी

Archana Banage

शैक्षणिक वर्षाची पूर्वतयारी आजपासून

Amit Kulkarni

आतापर्यंत 1,38,656 जणांना लस

Amit Kulkarni

कर्नाटक राज्यातील पीयूसी द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर

Tousif Mujawar

हिजाबप्रकरण विस्तृत पीठाकडे

Amit Kulkarni
error: Content is protected !!