Tarun Bharat

कर्नाटक: मुख्यमंत्री बदलाबाबत भाजप हाय कमांड निर्णय घेईल: मंत्री पुजारी

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

मंत्री कोटा श्रीनिवास पूजारी यांनी मुख्यमंत्री बदलाबाबत बोलताना सांगितले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्री बदलाबाबत भाजप हाय कमांड निर्णय घेईल. त्यामुळे त्यांचे लक्ष फक्त विकासावर आहे, असे ते म्हणाले. बुधवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यासंदर्भात योग्य ती पावले उचलतील.

मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना ते म्हणाले की, येडियुरप्पा यांनी कर्नाटकमध्ये भाजपाची बांधणी केली आणि त्यांना लोकांची नाडी माहित आहेत. पण कर्नाटकातील नेतृत्व बदलण्याबाबत त्यांना काही माहिती नाही.

कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री बदलाबाबतच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की त्यांची वक्तव्ये कधीही भाजपासाठी मार्गदर्शक ठरू शकत नाहीत. तसेच, मुख्यमंत्र्यांना धार्मिक नेत्यांनी उघडपणे पाठिंबा दर्शविताना ते म्हणाले की लोकशाही आस्थापनेत प्रत्येक नागरिकाला हे करण्याचा अधिकार आहे. परंतु पक्षाचे नेतृत्व यावर आवाहन करेल.

Related Stories

बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोजक्या शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांचा काळा दिन

Abhijeet Shinde

बेंगळूर मनपाचा आज अर्थसंकल्प

Amit Kulkarni

कर्नाटक : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी ७१ टक्के मतदान

Abhijeet Shinde

कर्नाटक: सरकारी कर्मचाऱ्यांना चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास मनाई

Abhijeet Shinde

कर्नाटकात विजेच्या दरात वाढ

Abhijeet Shinde

कर्नाटकात बुधवारी कोरोना रुग्ण संख्येत वाढ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!