Tarun Bharat

कर्नाटक मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी लोकमान्य ची ११ लाखांची मदत

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देत आहे. कर्नाटक सरकारही औषधोपचार आणि गोर गरिबांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना राबवित आहे. या पार्श्वभूमीवर आज बेळगाव येथील लोकमान्य मल्टीपर्पज को ऑप. सोसायटीने कर्नाटक मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंड साठी ११ लाखांची भरीव मदत केली आहे.

बेळगाव जिल्हा पालक मंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे हा मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. चेअरमन किरण ठाकूर यांच्या वतीने संचालक अनिल चौधरी, पंढरी परब आणि गजाननराव धामणेकर यांनी हा निधी दिला आहे. याप्रसंगी बेळगावचे जिल्हाधिकारी एस. बी. बोमनहळ्ळी, खासदार सुरेश अंगडी, आमदार अनिल बेनके, पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबारगी , पोलीस आयुक्त लोकेशकुमार व इतर अधिकारी उपस्थित होते.

संकटकाळी मदत करणे हा संस्कृती आहे. लोकमान्य ने हा मदतीचा वसा नेहमीच जपला आहे. सरकार करत असलेल्या मदतीच्या कार्यात लोकमान्य ने पुढाकार घेऊन मदतीचे हे पहिले पाऊल उचलले आहे अशी माहिती यावेळी संचालकांनी दिली. पालकमंत्री व सर्व अधिकारीवर्गाने याबद्दल किरण ठाकूर आणि लोकमान्य परिवाराचे आभार मानले.

Related Stories

कणकुंबी-पारवाड ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार

Amit Kulkarni

येळ्ळूर आखाडा खटल्याची सुनावणी पुढे ढकलली

Patil_p

20 वाहने जप्त; विनामास्क फिरणाऱया 290 जणांवर गुन्हा

Amit Kulkarni

बांधकाम कामगारांसाठी आलेल्या किटमध्ये गैरप्रकार

Omkar B

येळ्ळूरमध्ये आजपासून कडक अंमलबजावणी

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्ते खुले असल्याचा दावा

Amit Kulkarni
error: Content is protected !!