Tarun Bharat

कर्नाटक: ‘या’ १५ जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात आता कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याच बरोबर काही जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात कोविडचा प्रसार सुरू आहे आणि गेल्या दोन आठवड्यांत १५ जिल्ह्यांमध्ये शहरी भागांपेक्षा खेड्यांमध्ये कोरोना संक्रमणाची अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत.

कर्नाटक राज्य कोविड वॉर रूम ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड, कोडगू, हसन, चिक्कमंगळूर, चामराजनगर, चित्रदुर्ग, मंड्या, कोलार, कोप्पळ, हावेरी, रामनगर, तुमकूर आणि विजापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत. .
जरी ग्रामीण भागात कशामुळे कोरोना पसरला याचा निश्चित अभ्यास झाला नसला तरी सरकार आणि आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की हे लोकांची गतिशीलता आणि कोविड नियमांचे पालन न केल्यामुळे आहे.

दक्षिण कन्नड, कोडगू आणि चिक्कमंगळूरच्या ग्रामीण भागातील कोरोनाची संख्या जास्त असल्याने जिल्ह्याबाहेरून प्रवास करणाऱ्यांविरूद्ध स्थानिकांचा रोष वाढवला आहे, विशेषत: बेंगळूरहून आलेले पर्यटक. दरम्यान राज्यातील आकडेवारी दर्शविते की, राज्यभरातील सुमारे ३७ हजार गावे आणि २७२ शहरे गेल्या सात दिवसांत कोविडमुळे संक्रमित झाली आहेत.

सर्वाधिक २० प्रकरणे असलेली २० गावे दक्षिण कन्नड, कोडगू, उडुपी, चामराजनगर आणि चिक्कमंगळूर या पाच जिल्ह्यांतील आहेत. तथापि, हे चिंताजनक नाही कारण यापैकी बहुतांश जिल्ह्यांनी गेल्या दोन आठवड्यांमध्ये जास्त रुग्ण बरे झाले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, राज्यात एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या २२,७२८ होती, बेंगळूर मध्ये सध्या ८,१९३ सकृ रुग्ण, दक्षिण कन्नड जिह्यात ३,५९५ रुग्ण आहेत.

Related Stories

कर्नाटक: केएसआरटीसी बस महाराष्ट्रात धावणार

Archana Banage

भाजप खासदार जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी

Archana Banage

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्रीच घेणार अंतिम निर्णय

Tousif Mujawar

बेंगळूरमध्ये ६१ ड्रग विक्रेत्यांना अटक

Archana Banage

चक्रीवादळ : एनडीआरएफची २४ पथके कर्नाटक, केरळ, गुजरात आणि महाराष्ट्रात तैनात

Archana Banage

कर्नाटकात पाचवी ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

Archana Banage
error: Content is protected !!