Tarun Bharat

कर्नाटक: युजीईटीचा निकाल जाहीर

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकच्या वैद्यकीय, अभियांत्रिकी व दंत महाविद्यालयाच्या (COMEDK’s) अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी पदवी प्रवेश परीक्षा (यूजीईटी 2020) चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.

विद्यार्थी आपला निकाल comedk.org या संकेतस्थळावर तपासू शकतात. कर्नाटकस्थित महाविद्यालयांमध्ये पदवीधर अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संगणक-आधारित परीक्षा १९ ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती.

स्कोअर आणि युजीईटी रँक कार्डच्या आधारे विद्यार्थ्यांना बेंगळूर आधारित केंद्राच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यावा लागेल. ज्यामध्ये त्यांना त्यांच्या आवडी आणि गुणवत्तेच्या आधारे वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळेल. तसेच विद्यार्थी बेंगळूर येथे ऑफलाइन केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेत भाग घेतील.

Related Stories

अनिल देशमुख यांच्या ईडीच्या कोठडीत वाढ

Abhijeet Khandekar

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Archana Banage

तज्ञांच्या सल्ल्यानुसारच लसीकरण मोहीम

Patil_p

मिरज परिसरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक

Archana Banage

अलवर सामूहिक बलात्कारप्रकरणी काँग्रेस लक्ष्य

Patil_p

महाजनको संपामुळे वाशिष्ठीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Patil_p