Tarun Bharat

कर्नाटक: येडियुरप्पा यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात भाजपमध्ये सुरु असलेल्या नेतृत्वबदलाच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा दिल्लीला रवाना झाले. गुरुवारी नवी दिल्ली येथे पोहोचल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारमण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विवीध विकासकामांसंदर्भात चर्चा केली. तसेच राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातही ते चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी म्हंटले आहे.

येडियुरापा त्यांनी संरक्षणमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटक शिवमोगा येथे संरक्षण संशोधन विकास संघटनेची (डीआरडीओ) स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन करण्याची विनंती केली. येडीयुरप्पा यांनी असा विश्वास व्यक्त केला की प्रयोगशाळेमुळे पश्चिम घाट प्रदेशातून सैन्य वापरासाठी नैसर्गिक उपाययोजनांचा शोध घेण्यात मदत होईल.

केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या शिष्टमंडळाने नोटबंदीमुळे झालेल्या विघातामुळे कर्नाटकसाठी ५४९५ कोटींच्या विशेष अनुदानासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी मान्य करण्याची विनंती केली.

दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतील आणि मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच इतर विषयांवर चर्चा करतील.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी मी केंद्रीय विकासमंत्र्यांशी राज्याच्या विकासकामांविषयी चर्चा करण्यासाठी दिल्ली येथे आलो आहे. मी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा करेन. असंतुष्ट आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तारासाठी सातत्याने दबाव असतो असेही ते म्हणाले.

या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, उपमुख्यमंत्री गोविंद एम. करजोल, मुख्य सचिव टी. एम.विजय भास्कर उपस्थित होते.

Related Stories

शाळा सुरू करण्याबाबत आज निर्णय?

Amit Kulkarni

कर्नाटकात २४ तासात ३५ हजाराहून अधिक बाधित रुग्णांची भर

Archana Banage

माजी राज्यपाल रामाजोईस यांचे निधन

Amit Kulkarni

कर्नाटक सरकार जारकिहोळींच्या पाठीशी : शिवकुमार

Archana Banage

कर्नाटकचे लसीकरण पोर्टल ‘या’ तारखेला होणार लाँच

Archana Banage

वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाढीव दरामुळे खासगी रुग्णालये अस्वस्थ

Archana Banage
error: Content is protected !!