Tarun Bharat

कर्नाटक: राज्यातील खासगी रुग्णालयांना सरकारचा कारवाईचा इशारा

बेंगळूर/प्रतिनिधी :

राज्यात अनेक खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना दाखल करून घेत नसल्याच्या घटना समोर येत आहे. आता रुग्णांना रुग्णालयात दाखल करून न घेतल्यास कर्नाटक सरकारने रविवारी राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कोरोना रुग्णांना नकार दिल्यास त्यांच्यावर फौजदारी खटल्यांसह कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सरकारने म्हंटले आहे. कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी बेंगळूरमधील जयनगर जनरल हॉस्पिटल आणि राजीव गांधी चेस्ट हॉस्पिटलला अचानक भेटी दिल्या. भेटीनंतर मंत्री सुधाकर यांनी विधान सौध येथे पत्रकारांशी संवाद साधताना खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याचा इशारा दिला.

कोरोनाच्या रूग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यास नकार दिले जातात. या प्रश्नांचा उत्तर देताना मंत्री सुधाकर यांनी ‘कोणत्याही रुग्णालयाने रूग्णांना दाखल करूनघेण्यास नकार देऊ नये. कोणत्याही रुग्णालयाने रुग्णावर उपचार करण्यास नकार दिल्यास त्याच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असा सज्जड दम यावेळी दिला.

यावेळी मंत्री सुधाकर यांनी राज्य सरकारने कोविड रुग्णांशी संबंधित सहा वेगवेगळ्या उपक्रमांचा अवलंब केला असल्याची माहिती दिली. यामध्ये कोरोना केअर सेंटर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, खाजगी वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय रुग्णालय, कॉर्पोरेट हॉस्पिटल आणि होम कव्हरंटाईनचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत असे ते म्हणाले

Related Stories

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 74 वर

Omkar B

एनसीसी कॅडेट्सतर्फे ‘स्वच्छता पंधरवडा’

Omkar B

खानापूर शहरात आजपासून दुर्गादौड

Amit Kulkarni

कोरोनाचे नियम होणार आणखी कठोर

Patil_p

रोगप्रतिकारक शक्तीवर्धक औषधांचे लोककल्प फौंडेशनतर्फे वितरण

Amit Kulkarni

बेळगावात पोलिसांना कोरोनाचा धोका वाढला

Tousif Mujawar
error: Content is protected !!