Tarun Bharat

कर्नाटक : राज्यात मंगळवारी बाधितांची संख्या वाढली

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. मंगळवारी राज्यात ४३७ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली यासह राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९,५२,०३७ वर पोहोचली आहे. दरम्यान राज्यात मंगळवारी सात कोरोना संक्रमित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासह राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १२,३४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान मंगळवारी ३०९ रुग्णांना कोरोनमुक्त झाल्याने डिस्चार्ज मिळाला. यासह राज्यात २ मार्च पर्यंत, एकत्रितपणे ९,३३,७३० रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले आहेत.

राज्यातील ४३७ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २८२ रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यातील आहेत. तर सात मृत्यूंपैकी चार जण बेंगळूर शहरी, दोन म्हैसूर आणि एक तुमकूर मधील आहे.

Related Stories

कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करा अन्यथा कारवाई

Archana Banage

सवदी यांचे वक्तव्य कर्नाटकातील जनतेला खुश करण्यासाठी : उपमुख्यमंत्री अजित पवार

Archana Banage

बुधवारी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार

Patil_p

कर्नाटक: सरकारी कर्मचाऱ्यांना चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास मनाई

Archana Banage

शिक्षकांनाही मिळणार कोरोना लस ; लसीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव

Archana Banage

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Tousif Mujawar