Tarun Bharat

कर्नाटक: राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांहून अधिक

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. राज्याला गुरुवारी मोठा दिलासा मिळाला. दरम्यान यशस्वी उपचारानंतर गुरुवारी ५,०७६ रूग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले, तर १,२३८ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांत राज्यात ८,२९४ रुग्ण बरे झाले आहेत. आता राज्यात १९,२०६ रूग्णांवर उपचार सुरू असून यातील २५८ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ८,९७,८०१ वर पोहोचली आहे. तर यापैकी ८,६६,६६४ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. राज्यात कोरोनमुळे आतापर्यंत एकूण ११,९१२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १२ जण गुरुवारीमृत्यू पावले आहेत. यासह राज्यात मृत्यूचे प्रमाण आता १.३२ टक्के आहे.

आरोग्य विभागाने राज्यात गेल्या २ ४ तासांत १५,५१४जलद प्रतिजैविक आणि ६८,७५६ आरटी-पीसीआर चाचण्यांसह एकूण ८४२७० नमुन्यांची तपासणी केली.

दरम्यान गुरुवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात ७०१ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ३,७६,५९२ वर पोहोचली आहे. यापैकी ३,५८,५५३ लोकांनी कोरोनाला पराभूत केलं आहे. जिल्ह्यात सध्या १३,८२० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाने आतापर्यंत ४,२१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी आठ मृत्यूची नोंद गुरुवारी झाली.

Related Stories

मशिदींवरील लाऊडस्पीकर रात्री १० ते सकाळी ६ बंद ; कर्नाटक वक्फ बोर्डाचा निर्णय

Archana Banage

कर्नाटक: विमानतळ कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोना लस

Archana Banage

कर्नाटक: ११ जानेवारीपासून गुलबर्गा ते तिरुपती विमान सेवा सुरु

Archana Banage

कर्नाटक : दैनंदिन कोरोना चाचणीत घट

Archana Banage

लोकप्रतिनिधींना लॉकडाऊन नको

Archana Banage

ग्रा. पं. मधील वैयक्तिक शासकीय योजनेतील जाचक अटी शिथिल करा

NIKHIL_N