Tarun Bharat

कर्नाटक: राज्यात सलग तिसऱ्या दिवशी बाधितांच्या संख्येत वाढ

बेंगळूर/प्रतिनिधी

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून देशात तिसऱ्या टप्प्यात लसीकरण मोहीम सुरु आहे. दरम्यान कर्नाटकात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५०० च्या वर गेली आहे. राज्यात कोरोनाने शुक्रवारी ६०० चा टप्पा ओलांडला.

दरम्यान राज्यात शुक्रवारी ६७७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून सर्वाधिक ४२७ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णायातून घरी परतले. तर ४ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६,३७४ इतकी आहे. तर राज्यात आतापर्यंत १२,३४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तसेच सध्या उपचारात असणारे सर्वाधिक रुग्णही बेंगळूरमध्येच आहेत. दरम्यान शुक्रवारी जिल्ह्यात ४४४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर २०८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या देखील ४,५९२ वर पोहोचली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,४९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

कर्नाटक : आता मुख्यमंत्री बदलण्याची वेळ

Archana Banage

कर्नाटकात बुधवारी कोरोनाचे ८,५८० रुग्ण

Archana Banage

हुबळी विमानतळावर मालवाहू टर्मिनल फेबुवारीपासून धावण्याची शक्यता

Omkar B

“आताच्या भारतीय महिलांना एकटं रहायचंय, त्यांना मुलं नकोयत;” भाजपा मंत्र्याचं विधान

Archana Banage

कर्नाटक : शेतकऱ्यांचे शनिवारी राज्यभरात आंदोलन

Archana Banage

कर्नाटक: भाजपच्या अंतर्गत कलहामुळे राज्यातील प्रशासन त्रस्त

Archana Banage