Tarun Bharat

कर्नाटक: रामनगर येथे पहिला कचरा ऊर्जा प्रकल्प उभारणार

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील बिदडी येथे राज्यातील पहिला कचरा ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. उभारण्यात येणाऱ्या या ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी राज्याचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते करण्यात अली. ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी बेंगळूरमध्ये सुमारे ५ हजार मेट्रिक टन कचरा तयार होतो आणि त्यासाठी लागणारी घनकचऱ्याची वैज्ञानिक विल्हेवाट लावण्याचा एक नवीन भाग आहे.

या प्रकल्पातून दररोज ६०० मे.टन प्रक्रिया केलेल्या कचर्‍याचा वापर करून ११.५ मेगावॅट वीज निर्मिती होईल. दरम्यान २६० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला जात आहे, त्यापैकी प्रत्येकी १३० कोटी रुपये कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड व बीबीएमपी यांनी दिले आहेत. दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पात २५ टक्के मिश्र कचरा वापरला जाईल, असे ते म्हणाले.

Related Stories

बेंगळूर: घरी चोरुन लस देणाऱ्या आरोग्य कर्मचारी महिलेला अटक

Archana Banage

कर्ज घेण्यास विरोध : काँग्रेसचा सभात्याग

Patil_p

कर्नाटकात शनिवारी ९ हजारून अधिक रुग्णांची भर

Archana Banage

न्यायालयीन चौकशीबाबत भूमिका स्पष्ट करा

Amit Kulkarni

कर्नाटकः ३१ डिसेंबरपर्यंत अंगणवाड्यांना वीजपुरवठा करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Archana Banage

कोरोना परिस्थिती पाहून एसएसएलसी परीक्षांचा निर्णयः शिक्षणमंत्री

Archana Banage