Tarun Bharat

कर्नाटक: लिंगायत समुदायासाठी महामंडळ स्थापन करण्याचे आदेश

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी राज्यातील राजकीयदृष्ट्या प्रभावशाली वीरशैव लिंगायत समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले.

स्वत: लिंगायत समुदायाचे असलेले येडियुरप्पा यांनी कर्नाटक वीरशैव-लिंगायत विकास महामंडळ (केव्हीएलडीसी) लवकरात लवकर स्थापन करण्याचा आदेश जारी केला.

उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवडी यांच्या नेतृत्वात समाजातील मंत्री आणि भाजपा आमदारांच्या गटाने येडियुरप्पा यांना महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली. राज्यात वीरशैव-लिंगायत यांची मोठी लोकसंख्या आहे, त्यातील लोक असे आहेत जे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत.

या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कर्नाटक वीरशैव-लिंगायत विकास महामंडळ स्थापन करण्याची गरज असल्याने तातडीने हे महामंडळ स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आदेशात म्हंटल आहे.

Related Stories

म्हैसूरमध्ये फिल्मसिटी निर्माण होणार

Amit Kulkarni

मधमाश्यांची खोकी असणारे कुंपण रोखणार हत्ती-मानव संघर्ष

Amit Kulkarni

बेंगळूर: फळे-भाजा विक्रीसाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या गाडीची निर्मिती

Archana Banage

कर्नाटक: राज्यात एका दिवसात ५५ हजाराहून अधिक जणांची तपासणी

Archana Banage

नूतन औद्योगिक धोरणात लघु, सूक्ष्म उद्योगांना प्राधान्य

Amit Kulkarni

बेंगळूर : मंत्री सुधाकर यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी साधला संवाद

Archana Banage