Tarun Bharat

कर्नाटक लॉकडाऊन : ४ लाख नागरिकांनी बेंगळूर सोडले

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक मंगळवारी रात्रीपासून ‘क्लोज डाऊन’ झाले आहे. परिवहन विभागाच्या बसने किमान चार लाख लोकांनी बेंगळूर सोडले आहेआणि आणखी दोन लाख लोक अजूनही त्यांच्या गावी परत जाण्यासाठी विविध बसस्थानकांवर थांबले आहेत. परिवहन अधिकारी आणि पोलीस सतत लाऊडस्पीकर वापरुन कोरोना जनजागृती करण्यासाठी लोकांना मास्क लावण्यासाठी आणि सामाजिक अंतर कायम ठेवण्यासाठीसांगत आहेत.

लॉकडाऊन झाल्याने नागरीकांनी स्वतःचे हाल होऊ नये यासाठी शहर सोडणे पसंत केले आहे. लॉकडाऊन झाल्यांनतर बेंगळूरमध्ये असणाऱ्या पर राज्यातील नागरिकांनी आपापल्या गावी जाण्यासाठी बस स्थानकात गर्दी केली होती. दरम्यान केएसआरटीसीने बस स्थानकावर जमलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बसेसची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

Related Stories

कर्नाटक: मुख्यमंत्र्यांकडून निपाणी तालुक्यातील पुरस्थितीची पाहणी; मदतीचे आश्वासन

Archana Banage

बेंगळूर : केरळमधील ड्रग पेडलर सीसीबीच्या जाळ्यात

Archana Banage

कर्नाटकात शुक्रवारी १० हजाराहून अधिक जणांना डिस्चार्ज

Archana Banage

कर्नाटकचे आरोग्यमंत्री श्रीरामुलू यांना मातृशोक

Archana Banage

मंडय़ा येथे तीन पुजाऱयांची हत्या

Patil_p

नव्या मंत्र्यांच्या नावांची आज होणार घोषणा

Amit Kulkarni