Tarun Bharat

कर्नाटक: वयोवृद्धांच्या मासिक पेन्शन योजनेत व्यापक भ्रष्टाचार उघडकीस

बेंगळूर/प्रतिनिधी

वयोवृद्धांच्या मासिक पेन्शन योजनेचा आधार ओळखपत्रांशी जोडल्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या योजनेची १ लाख २० हजार बनावट खाती रद्द करण्यात आली आहेत. महसूलमंत्री आर. अशोक यांनी या विषयी माहिती दिली. त्यांनी अशा लोकांविरूद्ध कायदेशीर कारवाई करत त्यांच्याकडून आतापर्यंत भरलेली रक्कम वसूल करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

अनेक लोकांनी एकाच नावाने वेगवेगळे पत्ते देऊन या योजनेद्वारे ४-५ ठिकाणी पेन्शन मिळवली आहे. अशा लोकांची यादी तयार करुन लवकरच या लोकांना नोटीस पाठविली जाईल, त्याचवेळी मृत व्यक्तीच्या नावेही पुष्कळ लोकांना अशी पेन्शन रक्कम मिळत होती ती आता बंद होणार आहे.

राज्य सरकार या योजनेवर वर्षाकाठी ७ हजार कोटी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे ही योजना आता भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आधार कार्डशी जोडली जाईल आणि आता ही रक्कम महसूल विभागातील कर्मचार्‍यांमार्फत घराघरात दिली जाईल. आता ही योजना दलालांपासून मुक्त ठेवण्यात येणार आहे.

Related Stories

कर्नाटक : डिजिटल माध्यमातून पोटनिवडणुकीचा प्रचार करा : मंत्री सुधाकर

Archana Banage

राजभवन चलो : सिद्धरामय्या, शिवकुमार यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Archana Banage

कर्नाटक : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली

Archana Banage

कर्नाटकात बुधवारी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट

Archana Banage

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर

Rohit Salunke

बेंगळूर हिंसाचार प्रकरणात संपतराज यांना अटक ही मोठी प्रगती: गृहमंत्री

Archana Banage