Tarun Bharat

कर्नाटक : वापरलेले मास्क, ग्लोव्हज विल्हेवाट बाबत न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात सुरू असलेल्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने मंगळवारीबृह बेंगळूर महानगर पालीकेने रूग्णालय आणि रूग्णांच्या निवासस्थानामधून गोळा केलेले वापरलेले मास्क आणि इतर वस्तू यांची विल्हेवाट कशी लावलीं जाते याबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

शहरातील कोरोना संबंधित दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने बायो मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट (बीएमडब्ल्यूएम) नियम, २०१६च्या निकषांनुसार बीबीएमपी नियमांची अंमलबजावणी करते की नाही याची खात्री करणासाठी हायकोर्टाने स्पष्टीकरण मागितले आहे. सरन्यायाधीश अभय श्रीनिवास आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने हे निर्देश जारी केले.

तत्पूर्वी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बीएमडब्ल्यूएम नियमांचे पालन करताना कोरोना रुग्णांवर उपचारादरम्यान निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

Related Stories

कर्नाटक: राज्यपाल विधान परिषदेवर पाच एमएलसींची नेमणूक करणार

Archana Banage

कर्नाटक: द्वितीय पीयूसी पुनर्मूल्यांकन निकाल जाहीर

Archana Banage

बेंगळूरमध्ये १५०० पेक्षा अधिक पोलीस संक्रमित, तर १४ मृत्यू : पोलीस आयुक्त

Archana Banage

कर्नाटक विधानपरिषदेच्या उपाध्यक्षपदी एम. के. प्रणेश यांची वर्णी

Archana Banage

प्रथम तरुणांना लस द्या : खा. मल्लिकार्जून खर्गें

Archana Banage

अग्निपथला शेतकरी व कामगार संघटनांचा विरोध

Tousif Mujawar
error: Content is protected !!