Tarun Bharat

कर्नाटक विकास ग्रामीण बँकेकडून कोरोना निवारणासाठी 50 लाखाचा निधी

प्रतिनिधी/ बेळगाव

कर्नाटक विकास ग्रामीण बँकेने कोरोना विरोधातील लढाईसाठी मुख्यमंत्री निधीला 50 लाखाचा निधी दिला आहे. बँकेच्या अधिकारी आणि कर्मचारीवर्गाच्या वेतनातून या निधीचे संकलन करण्यात आले आहे. बँकेचे चेअरमन पी. गोपीकृष्ण यांनी धारवाडच्या जिल्हाधिकारी दीपा चोलण यांच्याकडे या रकमेचा धनादेश सुपूर्द केला. या निधीतील 22.5 लाख रुपये पंतप्रधान निधीसाठी, 20 लाख रुपये मुख्यमंत्र निधीसाठी आणि 7.5 लाख रुपयांचा निधी धारवाडमधील सिव्हिल हॉस्पिटलसाठी देण्यात आला आहे.

बँकेने देऊ केलेल्या या मदतीबद्दल जिल्हाधिकारी दीपा चोलण यांनी आभार मानले. यावेळी धारवाड जि. पं. चे सीईओ डॉ. बी. सी. सतीश, बँकेचे वरि÷ सरव्यवस्थापक पी. नागेश्वरराव, मुख्य व्यवस्थापक श्रीकांत हेगडे, वरि÷ व्यवस्थापक के. टी. भट्ट आणि उल्हास गुणगा आदी उपस्थित होते.  

Related Stories

जिल्हाधिकाऱयांची एडीएलआर कार्यालयाला अचानक भेट

Amit Kulkarni

वनखात्याचे बसवराज पाटील यांचा पर्यावरणप्रेमींकडून सत्कार

Omkar B

दसऱ्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करा व पथदीप लावा

mithun mane

नर्सरीतील प्लास्टिक मुक्तीचा निर्णय हवेतच

Amit Kulkarni

दुचाकीस्वाराला वाचविताना बस गटारीत अडकली

Amit Kulkarni

नरवीर चषक स्पर्धेत फॉरेव्हर संघाला जेतेपद

Amit Kulkarni