Tarun Bharat

कर्नाटक : विशेष महिला औद्योगिक पार्क असणारे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य

बेंगळूर / प्रतिनिधी

महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटक सरकार लवकरच म्हैसूर, धारवाड, हरोहल्ली आणि कलबुर्गी येथे त्यांना महिलांना समर्पित विशेष औद्योगिक पार्क उभारणार असल्याची घोषणा अवजड आणि मध्यम उद्योग मंत्री मुरुगेश निरानी यांनी गुरुवारी बेंगळूर येथे केली.

येथील एका हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला उद्योजकता दिनानिमित्त UBUNTU Consortium of Women Entrepreneurs Associations ने आयोजित केलेल्या ‘Together We Grow’ या महिला उद्योजक कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री यांच्या हस्ते झाले. UBUNTU हे महिला उद्योजक संघटनांचे एक संघ आहे. 30 हून अधिक महिला उद्योजक संघटना आणि 1,500 सदस्य एकाच व्यासपीठाखाली कार्य करतात.उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांनी नवोदित महिला उद्योजकांना त्या योजनांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Related Stories

बसवाण गल्ली डेनेज समस्या जैसेथे

Amit Kulkarni

पीक विमा योजनेसाठी उद्या अंतिम मुदत

Amit Kulkarni

बटर विक्री करणाऱयाच्या मुलीने मिळविले 95.04 टक्के गुण

Patil_p

पावसामुळे भाजीपाला दरात वाढ

Patil_p

कोरोना परिस्थिती पाहून एसएसएलसी परीक्षांचा निर्णयः शिक्षणमंत्री

Archana Banage

बेंगळूरमधील 5 इस्पितळांना महापालिकेकडून ‘कारणे दाखवा’

Amit Kulkarni