Tarun Bharat

कर्नाटक : शुक्रवारी ३ हजाराहून अधिक रुग्णांची भर

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत चालली आहे. शुक्रवारी राज्यात ३,५८९ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. दरम्यान राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दररोज कमी होत आहे. शुक्रवारीही पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात विविध जिल्ह्यातून ८,५२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. शुक्रवारी एकूण ४९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ११,१४० रुग्णांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाचे ५९,४९९ रुग्ण उपचार घेत आहेत.

बेंगळूरमध्ये १,८११ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. बेंगळूरमध्ये सध्या कोरोनाचे ३७,५३४ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी बेंगळूरमध्ये २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर बेंगळूर शहरी जिल्ह्यात ५,७८८ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी परतले आहेत. शहरातील कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ३,८४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

कर्नाटक: मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाने सरकारकडून सर्व कार्यक्रम रद्द

Archana Banage

नव्या धोरणामुळे शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन

Patil_p

पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा : मुख्यमंत्री बोम्माई

Abhijeet Khandekar

बेंगळूर : म्युकर मायकोसिसच्या घटनांमध्ये वाढ

Archana Banage

दहावी परीक्षेविषयी विद्यार्थी, पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा

Amit Kulkarni

मुख्यमंत्रिपदाची खुर्ची रिकामी नाही!

Amit Kulkarni
error: Content is protected !!