Tarun Bharat

कर्नाटक सरकारचा डिसेंबरमध्ये शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार

बेंगळूर/प्रतिनिधी

प्राथमिक आणि माध्यमिक विभाग शाळा सुरु करण्याचा विचार करत आहे. दरम्यान शिक्षण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इयत्ता ८, ९ आणि १० वी चे वर्ग चार तासांचे असतील, तर ग्रेड ४ ते ७ कालावधी दोन तास असतील असे म्हंटले आहे.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातील शाळा आणि पीयू महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग तयारी करत आहे. २ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सूचना विभागाचे आयुक्त सर्व जिल्ह्यांतील उपसंचालक (डीडीपीआय) यांच्यासमवेत, शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन चर्चा केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विभाग १ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या महाविद्यालयांच्या कामकाजावर बारीक नजर ठेऊन असणार आहे. डिसेंबरच्या मध्यापासून दहावी आणि पीयूसी २ च्या शाळा पुन्हा सुरू करण्याची योजना आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत नुकत्याच झालेल्या बैठकीतही यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. “मुख्यमंत्र्यांनीही टप्प्याटप्प्याने शाळा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले. सूचनांच्या अनुषंगाने पदवी महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाकडे पाहावे लागेल, असेही सूत्रांनी सांगितले.

Related Stories

राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या 23,057

Amit Kulkarni

कर्नाटाकातील १० जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता : हवामान विभाग

Archana Banage

इंटरनेटची समस्या दूर करण्यासाठी हालचाली

Amit Kulkarni

कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर लोकसभेत सुप्रिया सुळे आणि विनायक राऊतांचा हल्लाबोल

Archana Banage

एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती

NIKHIL_N

केएसआरटीसीची कार्गो सेवा सुरू

Amit Kulkarni