Tarun Bharat

कर्नाटक सरकारने ऑनलाइन गेमद्वारे जुगार खेळण्यावर घातली बंदी

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

ऑनलाइन गेम्सद्वारे जुगार खेळण्यावर बंदी घालण्यासाठी सरकार कायद्यांचा विचार करीत असल्याचे शुक्रवारी गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले.

बोम्माई यांनी पत्रकारांशी बोलताना, ऑनलाइन गेमिंगच्या त्रासाला तरुण बळी पडत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. जर कोणी तरूण जुगार खेळत असतील तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तक्रार नोंदवावी असे त्यांनी पालकांना आवाहन केले.

अन्य राज्यांमध्येही लागू केलेले समान कायदे सरकार पहात आहे. यावर अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. मुख्यमंत्र्यांसमवेत या विषयावर चर्चा झाली आहे, असे बोम्माई म्हणाले.

शुक्रवारी, तामिळनाडूने ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणारा अध्यादेश काढला. अध्यादेश अॅप वापरकर्ते आणि कंपन्या या दोघांना दंड होणार आहे.

Related Stories

कर्नाटक: २३ जिल्ह्यातील १३० तालुके पूरग्रस्त

Abhijeet Shinde

राम मंदिरासाठी निधी मागायला आलेल्या व्यक्तींनी धमकावले : कुमारस्वामी

Abhijeet Shinde

बेळगावसह राज्यातील तीन महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं

Abhijeet Shinde

दर्जेदार आरोग्य सेवा हा मूलभूत हक्क : आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde

बेंगळूर : मंत्री सुधाकर यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी साधला संवाद

Abhijeet Shinde

बेंगळूर: एमएएचई २५ हजार विद्यार्थ्यांचे करणार मोफत लसीकरण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!