बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमेटीने राज्य सरकारने कोरोना काळात वैद्यकीय उपकरणाच्या खरेदीत दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावर काँग्रेस नेते ठाम आहेत. राज्य सरकारला या प्रकरणात काही लपवायचे नसेल तर उच्च म्हणजे उच्च कोर्टाच्या न्यायाधीशांच्या मार्फत तपासणी करुन करा. न्यायालयीन चौकशी करण्यास सरकार टाळाटाळ करीत असेल तर भ्रष्टाचार झाला आहे असेत्यांनी म्हंटले आहे.
सिद्धरामय्या यांनी केपीसीसीने जारी केलेली कागदपत्रे सरकारी कागदपत्रे आहेत. काही मंत्र्यांनी दिलेली कागदपत्रे देखील अधिकृत आहेत. मग दोन्ही कागदपत्रे कोर्टासमोर का ठेवली जाऊ नये जेणेकरुन भ्रष्टाचार झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल. पंतप्रधान कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या कागद पत्रातून एका व्हेंटिलेटरची किंमत ४ लाख असल्याचे म्हंटले आहे. मग पंतप्रधान कार्यालयातून मिळविलेले हे कागदपत्र बनावट आहेत काय? केंद्र सरकारने कमी दर्जाचे व्हेंटिलेटर ४ लाखात विकत घेतले आहे का? राज्य सरकारकडून खरेदी केलेला १८ लाख रुपयांचा व्हेंटिलेटर सर्वोत्तम आहे काय? केंद्र सरकारने ४ लाख रुपयांचा व्हेंटिलेटर खरेदी करून देशातील जनतेची फसवणूक केली आहे का हे सरकारने स्पष्ट करावे का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांच्यावर टीका करताना त्यांनी प्रथम मंत्री झालेले डॉ. सुधाकर आज 13 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे सिद्धरामय्या यांना अर्थसंकल्प, प्रस्ताव मंजूर आणि वाटपाची व्याख्या समजावून देत आहेत. सुधाकर यांना सन २०१८ मध्ये तिकीट देऊन आपली मोठी चूक झाल्याचे ते म्हणाले.