Tarun Bharat

कर्नाटक : सामाजिक कार्यक्रमांना ५०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्य सरकारने मंगळवारी ५०० लोकांना सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली. मात्र कोविड -१९ च्या संभाव्य दुसऱ्या समूह संसर्गाच्या भीतीने सिनेमा हॉलमध्ये ५० टक्केच जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

मार्गदर्शक सूचनांच्या नव्या संचामध्ये मुख्य सचिव पी. रवी कुमार यांनी केंद्राने या निर्णयाला परवानगी दिली आहे. तसेच थिएटरसाठी ५० टक्के प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ती २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान कोविड -१ ९ च्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि संभाव्य द्वितीय वेव्हचा विचार करून तसेच बहुधा सावधगिरीची बाब आणि नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

विवाह, वाढदिवस साजरा यासह इतर कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त ५०० लोकांना परवानगी दिली जाईल, असे या परिपत्रकात नमूद केले आहे. प्रति व्यक्तीला ३.२५ चौरस मीटरचे शारीरिक अंतर सुनिश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, १००० चौरस क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ३७६ लोक असू शकतात तर ५०० चौरस मीटर जागेवर १५८ पेक्षा जास्त लोक नसावेत, असे म्हंटले आहे. हानियम प्रति व्यक्ती३. २५ चौ.मी. हा सामाजिक अंतर राखण्याचा नियम योग केंद्र आणि व्यायामशाळांनाही लागू असणार आहे. तर हॉटेल आणि रेस्टॉरंट्सला पूर्ण क्षमतेने चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दुकाने, मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि करमणूक उद्यानात प्रवेश करणे त्या जागेच्या आकारावर अवलंबून असेल, असे कुमार यांनी परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान गर्दीला आकर्षित करणारे विशेष कार्यक्रम टाळले जातील असे परिपत्रकात म्हंटले आहे.

“कोविड -१९ चा धोका अजूनही कमी झालेला नाही. परंतु राज्यात अलिकडच्या काळात कोरोना रुग्णांचीम संख्या घटत असली तरी सावधगिरी बाळगणे आवश्यक असून अद्यापही धोका टळलेला नाही. त्यामुळे फेस मास्क, हँड सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग इत्यादींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

Related Stories

अवयवदानाचे महत्त्व वाढले

Tousif Mujawar

बेंगळूर: बीबीएमपी झाडे मोजण्यासाठी कृषी विद्यापीठाची मदत घेणार

Archana Banage

पाणीपुरवठा योजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Amit Kulkarni

कर्नाटक : पावसात 2.33 लाख हेक्टर पिकांचे आणि, 3.5 हजार घरांचे नुकसान; बोम्माई

Abhijeet Khandekar

कर्नाटक न्यायालय;शैक्षणिक संस्थेत हिजाबबंदी योग्य

Abhijeet Khandekar

राज्यातील पावसामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Archana Banage