Tarun Bharat

कर्नाटक सीईटी परीक्षा २८,२९ ऑगस्टला

बेंगळूर/प्रतिनिधी

अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट २८ आणि २९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी दिली आहे.

दरम्यान सीईटी परीक्षा २८ आणि २९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. प्रत्येक विषयात ६० गुण असतील,” असे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

गणित व जीवशास्त्र परीक्षा पहिल्या दिवशी तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रचा पेपर दुसर्‍या दिवशी घेण्यात येणार आहे. १५ जूनपासून नोंदणी सुरू होईल. तसेच पीयूसी गुण विचारात घेतले जाणार नाहीत असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण मिळवणे आवश्यक आहे.

Related Stories

कोविड रूग्णाचा निष्काळजीपणामुळे मृत्यू ; डॉक्टर आणि इतर पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Archana Banage

कोगे येथे गोठ्यास आग लागून लाखोंचे नुकसान

Archana Banage

वारीला येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधांसह पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्या

Kalyani Amanagi

केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात, देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला

Archana Banage

कर्नाटक पोटनिवडणूक निकाल: मस्कीत काँग्रेसचा विजय; अधिकृत घोषणा होणे बाकी

Archana Banage

कोल्हापुरात कोरोनाग्रस्तांची संख्या 218 वर; शाहूवाडीत सर्वाधिक 69

Archana Banage