Tarun Bharat

कर्नाटक: ‘हा’ जेडीएस नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

बेंगळूर/प्रतिनिधी

जेडीएस नेते मधु बंगरप्पा लवकरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी पक्षात प्रवेश केल्याच्या बातम्या सुरू आहेत. मधू बंगारप्पा यांनी नुकतीच ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झालेल्या आपल्या समर्थकांना संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली.

ऑक्टोबर २०१८ मध्ये लोकसभा पोटनिवडणूक झाल्यापासून ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील असे म्हंटले जात आहे. २०१८ मध्ये ते जेडीएस-कॉंग्रेसचे उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधात भाजपचे बी. राघवेंद्र यांना उमेदवारी दिली होती. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक नेत्यांनी जिल्ह्यात मधु यांच्यासाठी प्रचार केला. विशेष म्हणजे कॉंग्रेस नेत्यांनी आणि जिल्हा कॉंग्रेस कमिटीने त्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थन केले.

दरम्यान मधू यांचा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांनी संपर्क कमी केला. त्यांनी केवळ जेडीएसपासून नव्हे तर माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि जिल्हा पक्षाच्या नेत्यांपासूनही चार हात लांब राहिले. या काळात त्यांनी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभाग घेतला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये आमदार कुमार बंगारप्पा आणि त्यांचे बंधू यांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याची हीच योग्य वेळ आहे असे म्हंटले. अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि एडिगाचे नेते थिमप्पा यांच्याशी मधु बंगारप्पा यांचे चांगले संबंध आहेत. मधू बंगारप्पा यांना कॉंग्रेसमध्ये आणण्यात कागदूंची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्याशी मधुचे तितकेच चांगले संबंध आहेत.

Related Stories

बेंगळूर: अभिनेते एच. जी. सोमशेखर राव यांचे निधन

Archana Banage

परिवहन कर्मचारी संप : केएसआरटीसीचे पाच कर्मचारी निलंबित

Archana Banage

कर्नाटक : राज्य सरकार कोविड सेंटरमध्ये उपलब्ध करून देणार आयसीयू बेड

Archana Banage

कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पोलिसांच्या मृत्यूचे प्रमाण घटले

Archana Banage

कर्नाटक: राज्यातील ‘या’ सात जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त

Archana Banage

कर्नाटक दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाबाबत मार्गदर्शक तत्वांच्या प्रतीक्षेत

Archana Banage
error: Content is protected !!