Tarun Bharat

कर्नाटक : १ ऑगस्टपासून रविवारचा लॉकडाऊन, रात्रीचा कर्फ्यू हटवला

बेंगळूर/प्रतिनिधी

केंद्र सरकारने अनलॉकसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केल्यानंतर दुसर्‍याच दिवसानंतर, कर्नाटक सरकारने रविवारी संपूर्ण लॉकडाउन व राज्यात दररोज रात्री असणारा कर्फ्यू हटवण्याची घोषणा केली आहे.

राज्य सरकारने सर्व रविवारी संपूर्ण लॉकडाउन लागू केला होता तसेच रात्री ९ ते पहाटे ५ या दरम्यान रात्रीचा कर्फ्यूही लागू केला होता. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अनलॉक मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने रविवारी २ ऑगस्टपासून रात्रीच्या बंदोबस्तासह १ ऑगस्टपासून रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेत असणारा नाईट कर्फ्यू हटवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव टीएम विजय भास्कर यांनी एका दिली आहे.

ही मार्गदर्शक तत्त्वे १ ऑगस्टपासून लागू होणार असून ३१ ऑगस्टपर्यंत ती वैध राहतील. दरम्यान, कोचिंग केंद्रांसह शैक्षणिक संस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहतील. थिएटर, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार, सभागृह, असेंब्ली हॉल आदी बंद राहणार आहे.

Related Stories

हलगा-बस्तवाडला पाण्याची सोय करणार

Amit Kulkarni

तरूण भारतचा ‘बेळगाव पॅटर्न’ ठरला हिट

Patil_p

होळीत रंगाचा बेरंग नको!

Patil_p

मराठीतून परिपत्रके देण्याची मागणी

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांची सालहळ्ळी येथे प्रचारसभा

Omkar B

चन्नम्मा सर्कलमध्ये वाहतुकीची कोंडी

Patil_p