Tarun Bharat

कर्नाटक : १ डिसेंबरपासून वैद्यकीय महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक सरकारने राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संबंधित सर्व वैद्यकीय, दंत, आयुष, पॅरामेडिकल, नर्सिंग आणि फार्मसी महाविद्यालये १ डिसेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्नाटकचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी शुक्रवारी ट्विटरवरुन याची घोषणा केली. सुधाकर यांनी कर्नाटक सरकारने १ डिसेंबरपासून आरजीयूएचएसशी संबंधित सर्व वैद्यकीय, दंत, आयुष, पॅरामेडिकल, नर्सिंग आणि फार्मसी महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. सुधाकर यांनी महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना विनंती करत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याची विनंती केली आहे.

Related Stories

Karnataka : कर्नाटक टीईटी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर सनी लिओनीचा फोटो?

Kalyani Amanagi

मुख्यमंत्री येडियुराप्पा संसर्गमुक्त, इस्पितळातून डिस्चार्ज

Amit Kulkarni

गृहमंत्र्यांच्या निवासस्थानीच कोविड सेंटर

Amit Kulkarni

सहय़ा नको, कोरोना नियंत्रण कामांवर लक्ष द्या

Amit Kulkarni

परिवहन कर्मचारी संप : केएसआरटीसीचे पाच कर्मचारी निलंबित

Archana Banage

केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

Tousif Mujawar