Tarun Bharat

कर्नाटक: २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी समिती नेमणार: शिक्षणमंत्री

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक सरकारने बुधवारी जाहीर केले की येत्या २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली जाईल. राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांच्या मते, समिती मूल्यांकन मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, ऑफलाइन शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण कार्यपद्धती, अर्थसंकल्पीय संसाधनांचा व्यावहारिक उपयोग आणि इतर संबंधित मुद्द्यांची मांडणी करतील.

शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी स्पष्ट केले की, “समितीत शिक्षणतज्ज्ञ, आरोग्य तज्ज्ञ, भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी), निमहन्सचे प्रतिनिधी, बाल विशेषज्ञ, तसेच कोविड तांत्रिक सल्लागार समिती (टीएसी) चे सदस्य आणि पालक, खाजगी शाळा आणि शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. दरम्यान, मंत्री एस. सुरेश कुमार म्हणाले, “येत्या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) ची अंमलबजावणी विचारपूर्वक केली जाईल.”

भरती दुरुस्तीची औपचारिकता लवकरात लवकर पूर्ण करून शिक्षक भरती प्रक्रिया वेगवान करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पुढील शैक्षणिक वर्षासाठी पाठ्यपुस्तक दोन महिन्यांच्या कालावधीत मुलांपर्यंत पोहोचतील याची व्यवस्था केली जाईल.

Related Stories

बेंगळूर: बीबीएमपीने भटक्या प्राण्यांच्या आहारासाठी दिले १५ लाख रुपये

Archana Banage

सीमाभाग महाराष्ट्राचाच; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला पुरावा

Archana Banage

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : सिद्धरामय्या

Archana Banage

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Tousif Mujawar

सरकारी शिक्षक कोरोना कामात व्यस्त

Archana Banage

आणखी एका हत्येने मंगळूर हादरले

Amit Kulkarni