Tarun Bharat

कर्नाटक : ८०.७२ टक्के रुग्णांची कोरोनावर मात

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकांत सोमवारी कोरोना बाधितांच्या संख्येत घाट झालेली पाहायला मिळाली. राज्यात सोमवारी ७,०५१ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. यासह, राज्यात संक्रमित लोकांची एकूण संख्या ६,४७,७१२ वर पोहोचली आहे. यापैकी ५,२२,८४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान सोमवारी ७,०६४ रूग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. तर सध्या राज्यात १,१५,४७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने सोमवारी आणखी ८४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ९,३७० लोकांचा बळी गेला आहे. राज्यात आयसीयूमध्ये ८४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ६७,३०३ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये २५७७०० जलद प्रतिजैविक आणि ४१५३३ आरटी-पीसीआर चाचण्यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ५३,२७,४६३ लोकांची तपासणी केली आहे.

Related Stories

कर्नाटक सरकारचा डिसेंबरमध्ये शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार

Archana Banage

कर्नाटक: मुख्यमंत्र्यांकडून निपाणी तालुक्यातील पुरस्थितीची पाहणी; मदतीचे आश्वासन

Archana Banage

कर्नाटक: एसएसएलसी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Archana Banage

कर्नाटक : साखर कारखान्यांची केंद्राला कर्जाबाबतचे नियम शिथिल करण्याची विनंती

Abhijeet Khandekar

माजी महापौर संपतराज यांना जामीन

Amit Kulkarni

आरक्षणाबाबत कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेणार : मुख्यमंत्री

Amit Kulkarni